खाण्यापेक्षा खाऊ घालण्यातच मजा असतेना! स्वयपाक हा माझा अजून एक आवडता छंद आहे .. माझ्या आवडत्या पदार्थांची मेजवानी आपल्या सगळ्यांसाठी ...पदार्थ करून बघा ,सगळ्यांना खाऊ घाला आणि कसे झाले प्रतिक्रिया सुद्धा आठवणीने द्या .
शनिवार, २३ जुलै, २०११
मैसूर पाक
साहित्य :
200 ग्रॅम बेसन, 200 ग्रॅम साखर, 350 ग्रॅम तूप. कृती : बेसन आणि चार मोठे चमचे तूप मिसळावे आणि त्याला चांगल्याप्रकारे परतावे. खाली काढून वेगळे ठेवावे. साखरेत एक कप पाणी टाकून पातळ चाशनी बनवावी. साखरेची चाशनी तयार झाल्यानंतर कमी आच करून थोडे भाजलेले बेसन मिसळून सारखे हालवावे. ह्याच प्रकारे सर्व बेसन संपेपर्यंत हिच प्रक्रिया करावी. नंतर मिश्रणाला हालवत थोडे-थोडे करून सर्व तूप टाकून द्यावे. आंचेवरून काढून तूप लावलेल्या ट्रेमध्ये टाकावे आणि त्याला समातलं करावे. मिश्रण थंडे झाल्यावर मनासारख्या आकारात कापावे. जास्तीचे तूप वेगळे करून घ्यावे.
गुळाच्या पोळ्या
साहित्य :
अर्धा किलो गुळ,
अर्धी वाटी खसखस,
अर्धी वाटी तीळ,
५-६ वेलदोड्यांची पूड,
१ चमचा खोबर्याचा किस,
अडीच चमचा डाळीचे पीठ,
२ वाट्या कणीक,
१ वाटी मैदा,
२ लहान चमचे तूप
कृती :
सर्वप्रथम कणिक, मैदा व अडीच टेबलस्पून डाळीचे पीठ एकत्र करुन त्यात जरा जास्त मोहन घालून पोळ्यांसाठी पीठ भिजवून ठेवा.
चांगला पिवळा गूळ किसून घ्या.
तीळ, खसखस व खोबर्याचा कीस भाजून घ्या व नंतर त्यास कुटून घ्या.
अडीच टेबलस्पून डाळीचे पीठ थोड्या तुपावर चांगले भाजून घ्या.
वेलदोड्यांची पूड घालून सर्व एकत्र मळून घ्या.
नंतर कणकेच्या दोन लाट्या जरा लाटून घ्या. त्यात गुळाच्या सारणाची मोठी गोळी घालून कडा दाबून, हलक्या हाताने पोळी लाटा. तव्यावर खमंग भाजा. त्या थोड्याशा कडकच होतात व खूप दिवस टिकतात.
तीळाच्या करंज्या
साहित्य : ३ वाट्या मैदा, १ वाटी तीळ, १ वाटी किसलेला गुळ, आर्धी वाटी खसखस, आर्धी वाटी परतलेला खवा
अर्धा टेबलस्पून तूप आणि १ पाव तूप घ्या.
कृती : सर्वप्रथम तीळ भाजून बारीक करुन घ्या. नंतर खसखसही भाजून घ्यावी. तीळ, किसलेला गुळ, खसखस,परतलेला खवा व तूप एकत्र करुन त्याचे सारण तयार करुन घ्या. मैद्यामध्ये मोहन घालून चांगले एकजीव करुन घ्या. चवीसाठी थोडे मीठ घालून दुधाने मैदा घट्ट भिजवून घ्या. दहा मिनिटे झाकून ठेवा. नंतर हव्या तेवढ्या आकाराच्या पुर्या लाटून त्यात करंजीप्रमाणे तिळाचे सारण भरा. तूपात ह्या करंज्या तळाव्यात.
अनघा हिरे
नासिक
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)

