कोकणची शान

शेवगाच्या फुलांचे बेसन
साहित्य : 250 ग्रॅम शेवगाची फुलं, 4 चमचे तेल, 1/2 चमचा जिरं, 1/2 चमचा मोहरी, चिमूट भर हिंग, चवीनुसार मीठ, 1/2 चमचा तिखट, 1/2 चमचा धने पूड, 1 कप बेसन, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर व 1/2 लिंबाचा रस.

कृती : सर्वप्रथम फुलांना स्वच्छ धुऊन घ्यावे. कढईत तेल गरम करून त्यात हिंग, मोहरी, जिरं व हिरव्या मिरच्या घालून फोडणी द्यावी. नंतर त्यात बेसन घालून परतून घ्यावे. त्यात बाकीचे सर्व साहित्य व फुलं घालून चांगले परतावे, थोडंसं पाण्याचा शिपका देऊन झाकण ठेवावे. सर्व्ह करताना लिंबाचा रस व कोथिंबीर घालावी.

------------------------------------------------------------------------------------------------
केळीच्या फुलांची भाजी




साहित्य : 8-10 केळीची फुलं, 50 ग्रॅम चण्याची डाळ (उकळलेली), 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरं, 1/2 चमचा हळद, 1 कांदा, 1 चमचा तिखट, 1 चमचा तेल, मीठ.

कृती : सर्वप्रथम केळीच्या फुलांना स्वच्छ करून त्याची सालं काढून घ्यावी. वरचा कडक भाग काढून उरलेल्या भागाला स्वच्छ धुऊन
त्याचे लहान लहान काप करावे. एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं व कडीपत्त्याची फोडणी द्यावी. त्यात बारीक
चिरलेला कांदा घालून परतून घ्यावा. नंतर त्यात उकळलेली चणा डाळ व केळीचे फुलं, मीठ, हळद व तिखट घालून 7-8 मिनिट परतून घ्यावे. स्वादिष्ट भाजी तयार आहे. या भाजीला पोळी, पुरी किंवा परोठे सोबत सर्व्ह करू शकता.


-----------------------------------------------------------------------------------------------

फणसाची उसळ

**********************************************************************************************
फणसाची भाजी



साहित्य : फणस कच्चे गरे अर्धा किलो, ४ मोठे कांदे, लसूण, आलं, हिरवी मिरची, धणे पूड, काळीमिरी पूड, गरम मसाला, मीठ चवीनुसार, मोहरी तेल.

कृती : सर्वप्रथम फणसाची साले काढून त्याच्या फोडी कराव्यात. या फोडी उकडून घ्याव्यात. नंतर आलं, लसूण, हिरवी मिरची यांची पेस्ट करावी. एका भांड्यात मोहरीचे तेल टाकून आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट त्यात टाकावी. त्यानंतर उकडलेला फणस कुस्करुन घ्यावा आणि तो त्यात घालावा. गरम मसाला टाकून ५ मिनिटे भाजी शिजवावी. ही भाजी खाण्यास पौष्टिक असते.


------------------------------------------------------------------------------------------------

मुगवड्यांची कढी




साहित्य : 3 कप ताक, 2 चमचे बेसन, 3 हिरव्या मिरच्या, १/२ चमचा हळद, ४लसणाच्या पाकळ्या , चवीनुसार मीठ,साखर १ चमचा ,१/२ चमचा तिखट, कोथिंबीर,१ किंवा २ साबूत लाल मिरच्या,३ लवंग , तमालपत्र , कढी पत्ता, 2 चमचे तूप.

वडे:- १ वाटी मुगडाळ ५तस भिजत्तेवून नंतर गर्मरीत वाटून त्यात १ हिरवी मिरची ,१ लसणाची पाकळीची पेस्ट, मीठ टाकून वडे टाळून घ्यावे

कृती : सर्वप्रथम ताकात बेसन, मीठ, तिखट, हळद आणि दीड कप पाणी घालून त्याचा घोळ तयार करावा. तूप गरम करून त्यात जिरे , हिंग, साबूत लाल मिरच्या, तमालपत्र, लवंग वाटलेला लसून व कढी पत्त्यांची फोडणी द्यावी.. नंतर ताक-बेसनाचा घोळ, हिरव्या मिरच्या घालून चांगले हालवावे. एक उकळी आल्यावर मंद आच करून त्यात तळलेले मुगाचे वडे टाकावे 10-15 मिनिट शिजवावे. सर्वात शेवटी कोथिंबीर घालावी.
*********************************************************************************************