खाण्यापेक्षा खाऊ घालण्यातच मजा असतेना! स्वयपाक हा माझा अजून एक आवडता छंद आहे .. माझ्या आवडत्या पदार्थांची मेजवानी आपल्या सगळ्यांसाठी ...पदार्थ करून बघा ,सगळ्यांना खाऊ घाला आणि कसे झाले प्रतिक्रिया सुद्धा आठवणीने द्या .
पराठा
साहित्य : 5 ब्रेड स्लाइस, 1/2 कप मुगाची डाळ स्वच्छ धुतलेली, 1 मोठा चमचा तांदूळ, 1 मोठा चमचा बेसन, 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलेचा तुकडा, चिमूटभर हळद, आवश्यकतेनुसार तेल, चवीनुसार मीठ, कोथिंबीर.
कृती : मुगाची डाळ व तांदूळ यांना चार तास पाण्यात भिजवून ठेवावे. नंतर पाणी काढून त्यात हिरवी मिरची, आलं व मीठ घालून मिक्सरमधून काढून घ्यावे. आता त्या मिश्रणात बेसन घालावे. धारदार चाकूने ब्रेडचे कोपरे कापावे. एका नॉनस्टिक तव्याला गरम करून त्यात थोडेसे तेल टाकावे. मिश्रणात कोथिंबीर घालून प्रत्येक स्लाइसला त्या मिश्रणात बुडवून तव्यावर ठेवून दोन्हीबाजून लाल होईपर्यंत परतून घ्यावे. तिकोनी कापून चटणी किंवा सॉस सोबत सर्व्ह करावे.
=====================
----------------------------------------------------------------------------------------------
मक्याचा पराठा
साहित्य :
२ वाटी मक्याचं पीठ, अर्धी वाटी बेसन, अर्धी वाटी कणीक, १ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, १ चमच्या आल्याची पेस्ट, १ चमचा लसणाची पेस्ट, १ चमचा जिरेपूड, चवीनुसार तिखट, मीठ, हळद अंदाजे १/२ लहान चमचा ओवा, १ चमचा तीळ, शेकण्यासाठी तेल.
कृती :
मक्याचे पीठ, बेसन, कणीक तिन्ही पीठ मिसळून घ्या. चवीनुसार तिखट, मीठ, हळद, जिरेपूड, ओवा, तीळ व आले पेस्ट घालून कोमट पाण्याने पीठ भिजवून घ्या. कोथिंबीर घाला. चांगले मळून लहान लहान आकारात गोळे बनवा. नंतर पराठे बनवून गरम तव्यावर शेकून घ्या. दही व लोण्यासोबत सर्व्ह करा.
द्वारा पोस्ट केलेले अनघा हिरे येथे
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)