सोजी मटर टिकी
साहित्य : 1 कप सोजी, 1 कप मटरचे दाणे, 3 बटाटे उकळलेले, 4 चमचे मैदा, चवीनुसार मीठ आणि 2 मोठे चमचे तेल.
कृती : सोजीला 4 ते 5 तास पाण्यात भिजत ठेवावे. बटाटे उकळून त्याचे सालं काढून त्याला किसून त्यात मटरचे दाणे, मीठ, मैदा व
थोडी सोजी मिसळून मनाप्रमाणे आकार देऊन टिकी बनवावी. नॉनस्टिक तव्यावर एक चमचा तेल टाकून त्यांना दोन्हीबाजूने थोडी सोजी लावून परतून घ्यावे. गरमा गरम टिकी बरोबर चटणी किंवा सॉस सर्व्ह करावे.
*****************************************************************************************************
व्हेज लॉलिपॉप
साहित्य : 1 कप उकडून-निथळून-चिरलेला पालक, अर्धा कप पनीर हाताने मोडून, 1 कप उकडलेला बटाटा, 1 कप कॉर्न थोडे ठेचून, कोथिंबीर, मीठ, मिरेपूड, ब्रेडक्रंप लागतील तसे घाला. जिरेपूड, अर्धा कप व्हाइट सॉस, (यासाठी बटरवर 1 टेबलस्पून मैदा परता.) थोडे दूध घाला. घट्ट सॉस बनवा.
कृती : सर्व पदार्थ एकत्र करावेत. त्याचे छोटे अंडाकृती गोळे बनवावेत. आइस्क्रीमचे लाकडी चमचे किंवा सूप स्टिक मोडून त्यावर हे गोळे टोचावे. आणि तळून घ्यावे. जेणे करुन लाल रंग आल्यावर ते बाहेर काढावेत थोडे गार झाल्यावर टोमॅटो सॉसबराबर मुलांना खाण्यास द्याव
---------------------------------------------------------------------------------
फणसाचे पॅटिस
साहित्य ;-२ वाटी फणसाचे बारीक कापलेले गर, २ उकडलेले बटाटे (छोटेशे), पाव चमचा हळद, पाव चमचा जिरे ओव्याची पूड, मीठ ,चवीपुरती साखर , आणि ४ बरीक् वाटलेली हिरवी मिरची.
कृती ;- सर्व जिन्नस एकत्र करावे आवडीचा आकार देऊन तव्यावर शालोफ्राय तळावे किंवा अवन मध्ये ३ मिनिटाला लावावी
---------------------------------------------------------------------------------------
हांडवा
साहित्य : 2 वाटी तांदूळ, 1/2 वाटी चण्याची डाळ, 1/2 वाटी उडदाची डाळ, 1/4 वाटी तुरीची डाळ, 2 चमचे दही, 1 चमचा आलं, लसूण, मिरची पेस्ट, मीठ चवीनुसार, 1/4 चमचा हळद, 1 चमचा साखर, 1/2 चमचा धणे पूड, 1/2 चमचा सोडा.
फोडणीचे साहित्य : 1 चमचा तीळ, 1/2 चमचा मोहरी, 1 चमचा तेल, कडी पत्ता, 4 लवंगा, कलमीचा तुकडा 1/2 इंच, 2 साबूत लाल मिरच्या.
कृती : सर्वप्रथम तांदूळ व डाळींना 7-8 तासासाठी भिजत ठेवावे. नंतर त्यात दही घालून वाटून घ्यावे. 4-5 तास या मिश्रणाला खमीर येण्यासाठी तसेच ठेवावे. नंतर त्यात साखर, मीठ, सोडा, हळद व धणे पूड घालून 35 मिनिट बेक करावे. थंड झाल्यावर त्यांचे काप करावे. लवंग व कलमीला तव्यावर भाजून त्याची पूड करावी. गरम तेलात फोडणी देताना सर्व फोडणीचे साहित्य घालून फोडणी तयार करावी व काप केलेल्या तुकड्यांवर पसरवावी. चटणीसोबत सर्व्ह करावे.
-----------------------------------------------------------------------------------------------