खाण्यापेक्षा खाऊ घालण्यातच मजा असतेना! स्वयपाक हा माझा अजून एक आवडता छंद आहे .. माझ्या आवडत्या पदार्थांची मेजवानी आपल्या सगळ्यांसाठी ...पदार्थ करून बघा ,सगळ्यांना खाऊ घाला आणि कसे झाले प्रतिक्रिया सुद्धा आठवणीने द्या .
सरबते खास
आंबा मधाच सरबत
साहित्य-
२ कैऱ्याची साल, अर्धी कैरी, ५ चमचे साखर, ४ मोठे चमचे मध, पुदिन्याची पान, २ वेलेपाणी वेलेपाणी व बर्फ.
कृती- कैऱ्या धुवून घ्या. त्याची साल बारीक चिरुन मिक्सरमध्ये टाका. त्यात कैरीही बारीक बारीक चिरून मिक्सरमध्ये टाकून सर्व बारीक करा व थोडे पाणी टाकून मिसळून गाळणीने गाळून घ्या. गाळलेल्या रसात मध घाला व तो चमच्याने व्यवस्थित मिसळा. त्यात पुदिन्याची पान व बर्फ वेळेवर टाकून सरबत सर्व्ह करा. वरील वेळेवर करण्याची सरबत झालीत.
--------------------------------------------------------------------------
आंबा खसखस सरबत
साहित्य- अर्धा पेला खसखस, दोन पिकलेल्या आंब्याचा गर, २ पेले पाणी, २ मोठे चमचे साखर, बर्फ.
कृती- प्रथम खसखस भिजत ठेवा. ती फुलल्यावर पाण्यासकट मिक्सरमध्ये फिरवून घ्या व गाळून घ्या. आंब्याचा गर काढून मिक्सरमध्ये फिरवून घ्या. त्यात तयार केलेले खसखशीचे दूध, साखर टाकून मिक्सरमध्ये एकजीव करा. वेळेवर ग्लासमध्ये बर्फ टाकून थंडगार सरबत प्यायला द्या.
--------------------------------------------------------------------------
कोकम सरबत
साहित्य- १ किलो ताजी लाल कोकम, अडीच किलो साखर, चमचा जीरेपूड, २ चमचे मीठ.
कृती- कोकम स्वच्छ धुवून पुसून आतला बियांचा भाग काढावा. तयार झालेल्या वाट्यांमध्ये साखर भरून ती मोठ्या काचेच्या बाटलीत अधेमधी साखरेचा थर देऊन भरावी. रोज बाटलीतील कोकम खालीवर हलवावी. सर्व साखर विरघळली की, कोकमांचा अर्क गाळून घेऊन त्यात मीठ व जिरेपूड घालून सिरप बाटलीत भराव. जरुरीनुसार पाण्यात मिसळून सरबत तयार करावं. ह्यात प्रिझर्वेटिव्ह जरूर नसते.
----------------------------------------------------------------------------------------
हिरव्या द्राक्षांची सरबत
हिरव्या रंगाची द्राक्षे घेऊन रस काढावा तो १पाव लिटर, अर्धा किलो साखर, पाव लिटर पाणी, १ चमचा सायट्रीक अॅसिड, पाव चमचा हिरवा रंग, पाव चमचा पिवळा रंग व द्राक्षाचे इसेन्स अर्धा चमचा.
कृती- द्राक्ष स्वच्छ धुवून सुटी करून जाड बुडाच्या पातेल्यात घालून लाकडी रवीने ठेचावित. नंतर मंद आचेवर ५-१० मिनिट शिजवावीत. यामुळे रस जास्त निघतो. नंतर तो मिक्सरमधून बारीक करावा. गाळून रस काढावा. नंतर बेसिक कृतीत दिल्याप्रमाणे साखरेचा पाणी टाकून पक्का पाक करून थंड झाल्यावर द्राक्षाचा रस टाकावा. पुन्हा उकळून गाळून सायट्रीक अॅसिड व इसेन्स व रंग टाकून थंड झाल्यावर प्रिझर्व्हेटीव्ह टाकून बरणीत भरावा. फ्रीज असल्यास फ्रीजमध्ये ठेवावा. उन्हाळ्यात वेळेवर थोडे पाणी टाकून बर्फ टाकून सर्व्ह करता येईल. हे टिकाऊ सरबत आहे. काळ्या द्राक्षाचे ह्याचप्रमाणे टिकाऊ सरबत करता येईल.
-----------------------------------------------------------------------------
anagha hiray
anagha.hiray@gmail.com
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)