साहित्य : मध्यम आकारांचे दोन सफरचंद, 1 कप कंडेस्ड मिल्क, 2 कप दूध, 1 कप साखर, 1 चमचा वेलची पूड, सुके मेवे.
कृती : सर्वप्रथम दुधात साखर घालून उकळून घ्यावे. सफरचंदाचा कीस करून 1 चमचा साजुक तुपात परतून घ्यावे. दूध गार झाल्यावर त्यात कंडेस्ड मिल्क व कीस केलेले सफरचंद घालून चांगले एकजीव करावे. नंतर त्यात वेलची पूड आणि मिक्स ड्रायफ्रूटस घालून सर्व्ह करा
------------------------------------------------------------------------------
वसंत बहार
साहित्य : 1 लीटर दूध, 50 ग्रॅम तांदळाचे पीठ, साखर चवीनुसार, 5-6 केशर काड्या गरम दुधात भिजलेल्या, 1 केळ, 1 चिकू, 1/2 सफरचंद, संत्र्याच्या काही फोडी, डाळिंबाचे दाणे, 1/2 चमचा वेलची पूड, सजावटीसाठी गुलाबाच्या पाकळ्या, चांदीचा वर्ख.
कृती : सर्वप्रथम सफरचंद, केळी, चिकू सोलून त्यांचे काप करावे. संत्र्याच्या फोडी सोलून घ्यावा. तांदळाच्या पिठात 1/2 कप दूध घालून त्याची पेस्ट तयार करावी. उरलेले दूध गरम करावे. उकळी आल्यावर त्यात तांदळाची पिठी घालून ढवळावे, त्यात साखर व केशर काड्या घालाव्या. नंतर त्यात वेलची पूड घालून हालवावे. मिश्रण थंड करावे. काचेच्या वाट्यात चिरलेल्या फळांच्या फोडी घालून वरून केसरी दूध घालावे. गुलाबाच्या पाकळ्या व चांदीचा वर्ख लावून सर्व्ह करावे. ही पाककृती दिसायला जितकी सुंदर आहे तेवढीच चवदार देखील आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
गव्हाची खीर
1 कप मध्यम जाड गव्हाचा रवा (दलीया किंवा Cracked wheat)
2 कप चिरलेला गुळ
3 कॅन नारळाचे दूध
3-4 वेलदोडे
3-4 केशर काड्या
छोटा तुकडा जायफळ
1/4 वाटी खसखस
1/4 वाटी सुके खोबरे
2-3 चमचे तूप
1 कप पाणी
1/4 वाटी बदाम, पिस्ते, काजूचे काप
10-15 बेदाणे
कृती -
गव्हाच्या रव्याला 1/4 चमचा तेल आणि चिमुटभर हळद चोळुन घ्यावी. 10 मिनीटे तसेच ठेवून पाण्याने एकदा रवा धुवून घ्यावा. त्यात एक कप पाणी घालून कुकर्मधे ठेवून 1 शिट्टी करून घ्यावी. कुकर गार होईपर्यंत खसखस वा खोबरे वेगवेगळे भाजून वेगवेगळे बारीक करून बाजूला ठेवावे. गुळ चिरून घ्यावा. कुकर गार झाला की शिजलेला रवा चमच्याने उपसून किंचीत मोकळा करून घ्यावा. एका जाड बुडाअच्या पाटेल्यात चिरलेला गुळ घालून त्यावर 2 चमचे तूप घालावे आणि मध्यम आचेवर पाक करायला ठेवावा. तूप वापरायचे नसेल तर 3-4 चमचे पाणी घातले तरी चालते. साअधरण कच्चा पाक तयार झाला की त्यात शिजलेला गव्हाचा रवा घालून ढवळावे आणि जर गातही असतील तर त्या मोडून घ्याव्यात. त्यावर नारळाच्या दुधाचे कॅन उघडुन एकेक करून ओटावा. खसखस वा खोबर्याचे कूट घालावे. एका वेगळ्या कढईत साधारण 1 चमचा तूप घालून त्यावर काजू-बदामाचे काप गुलाबी रंगावर भाजून ते खिरीमधे घालावेत. बेदाणे, वेळची, जायफळ आणि केशर थोडे जाडसर बारीक करून त्यावर घालावे. गॅस बारीक करून खीर उकळु द्यावी. मधून मधून ढवळत राहावे नाहीतर खाली लागण्याचा संभव असतो. साधारण 5 मिनीटानी गॅस बंद करावा.
====================================================