खाण्यापेक्षा खाऊ घालण्यातच मजा असतेना! स्वयपाक हा माझा अजून एक आवडता छंद आहे .. माझ्या आवडत्या पदार्थांची मेजवानी आपल्या सगळ्यांसाठी ...पदार्थ करून बघा ,सगळ्यांना खाऊ घाला आणि कसे झाले प्रतिक्रिया सुद्धा आठवणीने द्या .
बुधवार, ४ डिसेंबर, २०१३
रंगीबेरंगी आइसक्रीम
साहित्य : 2 लीटर दूध, 1/2 साखर, 4 मोठे चमचे कस्टर्ड पावडर, 2 मोठे चमचे कोको पावडर, 2 कप गाजर रस.
कृती : एका भांड्यात दुधाला उकळत ठेवावे. त्यात साखर टाकून 10 मिनिट अजून उकळावे. नंतर दुधाला खाली उतरवून 3 भागात वेग वेगळे करावे. पहिल्या भागात कस्टर्ड पावडर मिसळून फ्रीजमध्ये ठेवावे. अर्धा तासानंतर ते थोडं जमण्यात येईल तेव्हा, दुसऱ्या भागात गाजराचा रस मिसळून ते मिश्रण कस्टर्डच्या वर घालून परत जमण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावे. अर्धा तासानंतर ते मिश्रण बाहेर काढून ठेवावे, उरलेल्या भागात कोको पावडर टाकून ते मिश्रणावर टाकावे आणि सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावे. जेव्हा आइसक्रीम पूर्णपणे जमेल तेव्हा बाहेर काढून त्याचे चौकोनी काप करून रंगीबेरंगी आइसक्रीम सर्व्ह करा.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा