खाण्यापेक्षा खाऊ घालण्यातच मजा असतेना! स्वयपाक हा माझा अजून एक आवडता छंद आहे .. माझ्या आवडत्या पदार्थांची मेजवानी आपल्या सगळ्यांसाठी ...पदार्थ करून बघा ,सगळ्यांना खाऊ घाला आणि कसे झाले प्रतिक्रिया सुद्धा आठवणीने द्या .
शनिवार, २३ जुलै, २०११
गुळाच्या पोळ्या
साहित्य :
अर्धा किलो गुळ,
अर्धी वाटी खसखस,
अर्धी वाटी तीळ,
५-६ वेलदोड्यांची पूड,
१ चमचा खोबर्याचा किस,
अडीच चमचा डाळीचे पीठ,
२ वाट्या कणीक,
१ वाटी मैदा,
२ लहान चमचे तूप
कृती :
सर्वप्रथम कणिक, मैदा व अडीच टेबलस्पून डाळीचे पीठ एकत्र करुन त्यात जरा जास्त मोहन घालून पोळ्यांसाठी पीठ भिजवून ठेवा.
चांगला पिवळा गूळ किसून घ्या.
तीळ, खसखस व खोबर्याचा कीस भाजून घ्या व नंतर त्यास कुटून घ्या.
अडीच टेबलस्पून डाळीचे पीठ थोड्या तुपावर चांगले भाजून घ्या.
वेलदोड्यांची पूड घालून सर्व एकत्र मळून घ्या.
नंतर कणकेच्या दोन लाट्या जरा लाटून घ्या. त्यात गुळाच्या सारणाची मोठी गोळी घालून कडा दाबून, हलक्या हाताने पोळी लाटा. तव्यावर खमंग भाजा. त्या थोड्याशा कडकच होतात व खूप दिवस टिकतात.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

1 टिप्पणी:
mala khup aavadtat..
khup chan blog...well done
टिप्पणी पोस्ट करा